सावदा : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बोगस शिक्षक भरती करण्यात आल्याप्रकरणी इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक शेख हारुन शेख इकबाल यांच्या फिर्यादीनुसार 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर जे.पाटील, तत्कालीन उपशिक्षण अधिकारी देवांग (पूर्ण नाव माहित नाही) व शेख जब्बार शेख कुरेशी यांना 25 मे पर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे.
अन्य संशयीत आरोपी पसार
या प्रकरणात अन्य आरोपीदेखील पसार झाले असून त्यांचा सावदा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे. या संशयीतांना अद्याप अंतरीम जामीन मिळाला नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.