सावद्यात तलवारीसह दोन जणांना अटक

0
सावदा (प्रतिनिधी)- शहरात तलवार बाळगणार्‍यां दोघांना अटक करण्यात आली. चंद्रकांत भागेश्वर व विशाल इंगळे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात दोन तलवारी मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध सावदा पोलीस सावदा स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व पोलीस कर्मचार्‍यांनी कोम्बिंग राबवून ही कारवाई केली.