सावदा : सावदा नगरपालिका कराची थकबाकी न भरल्याने दोन पतसंस्थांच्या कार्यालयास नगरपालिकेतर्फे सील लावण्यात आले. यात सावदा मर्चंट पतसंस्था तसेच लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचा समावेश आहे. साावदा मर्चन्ट पतसंस्थेकडे नगरपालिकेची कराची थकीत रक्कम दोन लाख 34 हजार असून 1 एप्रिल रोजीदेखील वसुलीसाठी पथक गेल्यानंतर सील लावण्यात आले मात्र 26 एएप्रिल रोजी प्रशासकीय अधिकारी विजयसिंह गवळी व डी.व्ही.पाटील यांनी नगरपालिकेला हमीपत्र लिहून देत महिनाभराआत कराची रक्कम भरणा करण्याची ग्वाही दिली मात्र रक्कम भरण्यात न आल्याने सोमवारी सील लावण्यात आले. थकबाकी असलेल्या लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचया कार्यालयास देखील सील लावण्यात आली. ही कारवाई नगरपालिकेच मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागप्रमुख अनिल आहुजा, लिपिक अरुण ठोसरे, कर्मचारी राजू मोरे आदींनी केली. दरम्यान, मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी थकबाकी न भरल्यास अशाच पद्धत्तीने कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.