सावद्यात पोटनिवडणुकीसाठी 70 टक्के मतदान

0

रावेर- तालुक्यातील सावदा येथील वॉर्ड क्रमांक 3 ब चे नगरसेवक स्व.प्रभाकर महाजन यांचे निधन झाल्यामुळे रीक्त जागेसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. त्यात सुमारे 70 टक्के मतदारांनी मतदान केले. दोन हजार 202 पैकी एक हजार 440 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदारांचा निरुत्साह असलातरी सायंकाळनंतर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. दरम्यान, ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीला पालिकेतील संख्याबळ कायम ठेवणे तर भाजपाला एका जागा वाढविण्यासाठी महत्वपूर्ण आहे. दरम्यान, 12 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे.