सावदा- अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी कृती करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला असून येथील विश्वहिंदू परीषद देखील या या मुद्यावर आक्रमक झाली आहे. देशभरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आली असून भुसावळ विभागाची हुंकार सभा 11 रोजी सावदा शहरात होणार आहे. येथील चित्रकुट नगर, विश्रामगृहासमोरिल भव्य प्रांगणावर सभा होत असून सभास्थानाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी मिलिंद कोरे यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आले.
राष्ट्रीय संयोजक करणार मार्गदर्शन
सभेस बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक सोहम सोलंकी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी फैजपूर सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, सावदा येथील स्वामी नारायण गुरूकुलचे संस्थापक अध्यक्ष भक्तिप्रकाशदासजी महाराज, महानुभाव पंथ मंदिराचे सुरेश शास्त्री मानेकरबाबा, डोंगरकठोरा येथील स्वरुपानंददास स्वामी तसेच आदी साधू-महंतांची उपस्थिती राहणार आहे. हुंकार सभा यशस्वीरीत्या करण्यासाठी विहिंपचे विभाग मंत्री कैलास गायकवाड, जिल्हा पालक दादा सिगत, प्रांत सत्संग प्रमुख नारायण घोडके, जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, जिल्हा कार्यवाह अॅड.कालिदास ठाकूर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. हिंदू बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
सभास्थानाच्या भूमिपूजनप्रसंगी नगरसेवक राजेंद्र चौधरी, पंकज नारखेडे, भास्कर साळुंखे, वना दांडगे, चंद्रकांत भोलाणे, संजय चौधरी, डॉ.चंद्रशेखर पाटील, अॅड.कालिदास ठाकूर, जितेंद्र भारंबे, सचिन बर्हाटे, रवींद्र महाजन, योगेश भंगाळे, विक्की भिडे, चंदन इंगळे आदींची उपस्थिती होती.