सावित्रीच्या लेकींना दिला मदतीचा हात

0

सांगवी : मुलींनी दत्तक पालक योजनेच्या निधीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अर्थिक निधीचा उपयोग करावा, असे मत जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर यांनी व्यक्त केले. जुनी सांगवीतील मराठी प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू मुलींना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे म्हणून आर्थिक मदत करण्यात आली. खजिनदार पोपट देवकर, दिलीप तनपूरे, कल्पना सोनवणे, रेश्मा चौगुले यांच्या हस्ते मदत करण्यात आली. अरुण सोनवणे, भोसले सुरेखा, सारिका आंद्रे, विजया जाधव, कविता चित्ते, मनिषा सोनवणे, सविता देशमुख, शोभा वाघमारे, लता सावळे, मृदुला कौटकर, पल्लवी राजगुरु, सुलोचना माने आदिंनी संयोजन केले. ज्योती फिपाळे यांनी सूत्रसंचलन केले. संतोष नवले यांनी आभार मानले.