सासरच्या जाच्याला कंटाळून तरुण विवाहितेची आत्महत्या : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा

Suicide of married woman in Dharangaon: Crime against husband and father-in-law धरणगाव : शहरातील हनुमान नगरातील 21 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाच्याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता घडली होती. या प्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
धरणगावातील हनुमान नगरातील रहिवासी असलेली विवाहिता डिंम्पल निलेश महाजन (21) हिचा पतीसह सासरची मंडळी सातत्याने छळ करीत होती तसेच मारहाण करीत असल्याने त्यास कंटाळून डिंपलने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता राहत्या घरात आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयताचे वडील जीतसिंग आनंदसिंग बयस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती निलेश अशोक महाजन, सासरे अशोक अभिमन महाजन, सासू निताबाई अशोक महाजन, मोठी नणंद छाया उर्फ बाळा जितेंद्र महाजन, नंदोई भाऊ जितेंद्र उर्फ बबलु संभाजी महाजन (रा.दोंडाईचा) व लहान नणंद वैशाली उर्फ सोनी वासुदेव देशमुख (रा.भंवरखेडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करत आहेत.