साहुर येथे सुरू असलेले जल आंदोलन 50 तासांनंतर स्थगित

0

शिंदखेडा। बुधवार 7 बुधवारी सकाळी 11:00 वाजेला शेतकरी व शिवसेनेच्या पदाधिकारी यांचे साहुर ता. शिंदखेडा येथे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जल आंदोलनास सुरवात करण्यात आली होती. त्या दिवशी अपर तहसीलदार यानी भेट दिली व विनंती केली की पाण्यातुन बाहेर यावे व आंदोलन थांबवावे. परंतु, आंदोलकांनी मागण्या मान्य केल्या तर आम्ही बाहेर येता असा पवित्रा घेतला होता. त्या नंतर अपर तहसीलदार लगेच तेथून निघून गेलेत. यानंतर आंदोलनस्थळी एकही प्रशासकीय व्यक्ती आंदोलनाच्या जागी उपस्थित नव्हता. वैद्यकीय पथक देखील अनुपस्थित होते. केवळ 2 पोलीस कर्तव्य बजावत होते.

प्रांताधिकारी दिला शासनाचा निरोप
आंदोलकांनी अपर तहसीलदार यांच्याकडून केलेल्या पाठपुराव्याची मागणी केली. दुसर्‍या दिवशी मंगळवार 9 जून रोजी जल आंदोलनाला 50 तास पूर्ण झाले. तेव्हा प्रांताधिकारी आले व त्यांनी कळविले की आपल्या आंदोलनाची दखल घेतली गेली आहे. आम्ही आपल्या आंदोलनाचा पाठ पुरावा केला आहे व आपल्या मागण्यांचे आम्हाला ऑक्टोबर महिन्या प्रर्यंत वेळ द्या या नंतर आंदोलकांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत वेळ देऊन आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात सेनेचे उपजिल्हा प्रमुख व प.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे सहभागी झाले होते.

यांचा होता सहभाग
आंदोलनात राकेश राजपूत, राजू रगडे , मयुर निकम,गणेश भदाणे, बबलू कोळी, किरण सावळे, गंगाराम शिरसाठ, रमेश सोनवणे, विलास कोळी, भुषण सोनवणे, योगेश सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, मनिलाल कोळी, प्रशांत सुर्यवंशी, छोटू सोळंकी ,अशोक वाघ ,दिनेश शिरसाठ, जयेश कोळी, कैलास बोरसे, भैय्या पाटील, गणेश ठाकरे, किशोर सदाराव ,कैलास ठाकरे, मनोज कुवर ,खटूबाई सावळे, संगीता सोनवणे, सुनंदा सोनवणे, सुरेखा सोनवणे, हिराबाई सोनवणे, सुखमाबाई कोळी, रेणुका कोळी, दीपमाला कोळी, आशा कोळी, मिराबाई कोळी, संगीता सोनवणे, इंदूबाई कोळी, शोबाबाई कोळी, रेखाबाई सोनवणे, रेखाबाई कुवर ,सुमनबाई कुवर , आशाबाई भिल ,विमल सोनवणे, विमलबाई जगदाळे, रत्नाबाई पटेल, शोभा बाई आखडमल ,सुशिला शिरसाठ, गिताबाई कोळी, आशा कोळी, सुनंदा सोनवणे असे अनेक शेतकरी शिवसैनिक व महिला जल आंदोलनात सहभागी झाले होते

अपर तहसीलदारांनी केली मनधरणी
दुसर्‍या दिवशी 8 जून रोजी दुपारी 2:30 वाजेला एक आंदोलक राजू रगडे यांची तब्येत खालवल्याने पोलीस निरीक्षक व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील डॉक्टर आले यांनी त्यांना दोंडाईचा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी यांना कळाले असावे म्हणून रात्री 10:00 वाजता अपर तहसीलदार व पोलीस निरीक्षक आले. आपल्या मागण्या ह्या आमच्या स्तरावरील नसून आम्ही फक्त आपल्या मागण्यांचे वरिष्ठ अधिकारी व मंत्रालयात कळविले असल्याचे अपर तहसीलदार यांनी स्पष्ट केले.