साहेब… एकदम ‘हिरोईन’ दाखवतो… 5 हजार लागतील…1500 ठरले अन् पोलिसांचा छापा

0

जळगाव – पोलिसांनी पाठविलेला डमी ग्राहक कुंटणखाना सुरु असलेल्या फ्लॅटवर पोहचला. याठिकाणी दलालाने डमी ग्राहकाला साहेब तुम्हाला हिंदी चित्रपटातील हिरोईनप्रमाणे सुंदर तरुणी दाखवतो, मात्र पाच हजार रुपये लागतील. 1500 रुपयात ठरले…. यानंतर डमी ग्राहकाने पोलीस उपअधीक्षकांच्या मागदर्शनाखाली पथकाला पैसे दिल्याचा संदेश पाठविला. अन् पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला. खेडी रोडवरील ज्ञानचेतना अपार्टमेंटमध्ये भाडे तत्वावर घेतलेल्या फ्लॅटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कुंटनखाना सुरु होता. सहन करता येत नाही अन् सांगता येत नाही, याप्रमाणे वैतागलेल्या येथील रहिवासी नागरिकांना पोलिसांच्या कारवाईने दिलासा मिळाला आहे. दरम्यान कारवाई पीडीत दोघांना आशादीप वसतीगृहात दाखल करण्यात आले असून उर्वरीत दोघा महिलांसह दलाल पुरूष या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपअधीक्षकांना मिळाली होती माहिती
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या खेडी रोडवरील ज्ञानचेतना अपार्टमेंटमध्ये खेडी बुद्रूक येथील गोपाळ प्रल्हाद पाटील यांच्या फ्लॅटमध्ये कुंटनखाना सुरु असल्याची गुप्त माहिती डिवायएसपी डॉ. रोहन यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, एलसीबी एपीआय निता कायटे, पंकज शिंदे, मारोतीराया, सुनिल मोरे, गिरासे यांचे पथक तयार केले. नियोजनानुसार सुरुवातीला कुंटखान्यावर डमी ग्राहक म्हणून एकाला पाठविण्यात आला. त्याने पैसे दिल्याचा संदेश मिळताच कारवाईचे ठरले होते. त्यानुसार उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन व पथकाने सापळा रचला होता.

पैसे दिल्याचा संदेश मिळाला अन् पथकाचा छापा
डमी ग्राहक कुंटनखाना सुरु असलेल्या फ्लॅटमध्ये गेला. ठिकाणी दलाल पुरूषाने डबी ग्राहकाला विचारणा केली. ग्राहकाने काय रेट आहे विचारल्यावर दलालाने पाच हजार रुपये सांगितील. पाच हजार म्हणताच डमी ग्राहकाने एवढे पैसे कसे काय? त्यावर दलाल उत्तरला साहेब हिंदी पिक्चरची हिरोईन आहे ना? बस तिच्यासारखीच पोरगी दाखवतो. यानंतर पाच हजार रुपयांवरुन 1500 रुपयांवर ठरले. दलालाला 1500 रुपये सोपविताच डमी ग्राहकाने सापळा रचलेल्या पथकाला मोबाईलवरुन संदेश पाठवून इशारा दिला. संदेश मिळताच अधिकार्‍यांसह पथकाने कुंटनखान्यावर छापा टाकला.

दलाल, 2 महिला व पिडीतांमध्ये पैशांची वाटणी
कुंटनखान्याच्या ठिकाणी दलाल पुरूष व दोन महिला एकत्रित मिळून हा कुंटनखाना चालवित होते. यात दलाल हा आलेल्या ग्राहकाला मुलगी आणून द्यायचा. तासाभरापासून तर दिवसभर अशाप्रमाणे ग्राहकाला तरुणी पुरविल्या जायच्या. पैशांचे अमिष दाखवून दलाल याने तरुणींना आमिष दाखविले व या व्यवसायात ओढल्याची माहिती आहे. कारवाईत पोलिसांना दोन पिडीत तरुणी मिळून आल्या असून त्या याच ठिकाणी वास्तव्यास असायच्या. तर ग्राहकाने सांगितल्यानुसार दलाल फोनवर संपर्क करुन बाहेरुन तरुणी बोलवायचा. यात काही महाविद्यालयीन विद्यार्थींचाही समावेश असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. एक हजारा पासून ते 5 हजार रुपयांपर्यंत याठिकाणचे रेट होते.ग्राहकाकडून मिळालेल्या पैशांमध्ये दलाल व दोन महिला याच्या वाटणी व्हायची यानंतर उर्वरीत पैसे संबंधित तरुणीला मिळायचे अशी माहिती मिळाली आहे. जर एक हजार रुपयात ठरले तर 300 रुपये दलाल, 200 रुपये महिला तर उर्वरीत 500 रुपये तरुणीला मिळायचे याप्रमाणे कुंटनखाना सुरु होता.

दलाल पुरूषासह दोन महिलांना अटक
पोलिसांनी या कारवाईत दोन महागडे मोबाईल एकूण 5 मोबाईल तसेच एक लाख रुपये किमतीची एम.एच. 19 सी.एन. 2121 या क्रमांकाची बुलेट जप्त केली आहे. तसेच दलाल पुरूषासह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तर पिडीत दोन मुलींना आशादीप वसतीगृहात दाखल करण्यात आले आहे. अटक केलेल्या तिघांना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विनायक लोकरे, राजेंद्र कांडेलकर, दिपक चौधरी करीत आहेत.