सिंगतमधील त्या तरुणाचा मित्रांनी मिळून केला खून

खिर्डी : रावेर तालुक्यातील सिंगत शिवारातील आंदलवाडीकडे जाणारस्या रस्त्यावर भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील 40 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करीत मयत हा कैलास भिका पाटील (40, पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) असल्याची ओळख पटवली होती तर मयत कैलासचा जवळच्याच मित्रांनी एलआयसीचा दहा ते बारा लाखांचा क्लेम मंजूर होण्यासाठी खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

एलआयसी क्लेम लाटण्यासाठी मित्राचा केला खून
घटनास्थळी निलेश निकम या नावाने कागदपत्र आढळल्याने मयत निलेश हाच असल्याचा आरोपीला देखावा करावयाचा होता मात्र पोलिस तपासात नेमके हे बिंग फूटले व खुनातील निलेश हाच मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट होवून या खुनात त्याचा साथीदार संतोष निळू बेंडाळे (45, निंभोरा बु.॥, ता.भुसावळ) असल्याचे स्पष्ट होताच त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघा संशयीतांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस तपासात उघडकीस आले बिंग
कैलास भिका पाटील (पिंप्रीसेकम) या तरुणाचे दोन्ही आरोपी मित्र आहेत. पैसे नसल्याने निलेश निकम आरोपी संतोष बेंडाळेची मदत घेत प्लॅन आखला. स्वतःच्या खूनाचा बनाव करीत कैलास पाटील याचा खून केला व चेहर्‍याची ओळख न पटल्यासाठी मृतदेहाजवळ निलेश निकम याने काही कागदपत्रे सोडली व नेमका आरोपींचा प्लॅन येथेच फसला. कागदपत्रांच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची दिशा फिरवत खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीव्हेट केले. पोलिसत तपासात निलेश निकम हा जिवंत असल्याची बाब समोर आली व मयत हा कैलास पाटील असल्याचे स्पष्ट होताच आरोपींचा प्लॅन बारगळला. निलेश याने स्वतःच्या नावाने दहा ते पंधरा लाखांची एलआयसी काढली असून मेल्याशिवाय क्लेम पास होणार नाही हे त्याला ठावूक असल्याने त्याने मित्राची हत्या केली व जाणीवपूर्वक तेथे काही कागदपत्रे सोडली मात्र आरोपीचा डाव त्याच्यावरच उलटला.

दोघा आरोपींना 7 पर्यंत पोलिस कोठडी
फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ व सहकार्‍यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करीत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.