पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे शिक्षणमंत्री ऑग ये कुंग यांच्या हस्ते सत्कार
पुणे : सिंगापूर-इंडिया हॅकेथॉन 2018 स्पर्धेत एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची टीम किलर कोडने सादर केलेल्या पार्किंग स्पेस अॅव्हेलेबिलिटी अॅण्ड मॉनिटरिंग इन युनिव्हर्सिटी कॅम्पस या विषयाला 4 हजार डॉलरचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना हे पारितोषिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे शिक्षणमंत्री ऑग ये कुंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पार्किंगसाठी सॉफ्टवेअरचा वापर
एमआयटीच्या किलर कोड टीममधील कुणाल खाडिलकर, अकांक्षा काळे आणि राहुल बारहाते यांना दिलेल्या विषयानुसार त्यांनी एक मॉडेल तयार केले. त्यावर संगणक व सॉफ्टवेअरवर पडताळणी केली. विशेष म्हणजे हे सोल्यूशन निःशुल्क तयार केले गेलेेे. यासाठी जीओटॅगिंग, साउंड क्यूआर, कॉम्प्यूटर व्हिजन आणि मशीन लर्निंगचा उपयोग केला होता. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये खेळाच्या मैदानात पार्किंग करणे, तसेच कॅम्पसमध्ये अव्यस्थित पार्किंगच्या जागी या सॉफ्टवेअरचा उपयोग करून योग्य पार्किंग करता येते. तसेच त्यामुळे पार्किंगमध्ये गाडी लावणे व काढणे सोपे होते. पार्किंगच्या वेळेस कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाची गरज पडत नाही. त्याचा संपूर्ण डेटा हा या सॉफ्टवेअरमध्ये नोंद केला जात असतो.
कमीत कमी खर्चाचा प्रकल्प
नान्यांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी येथे 12 ते 14 नोव्हेंबर 2018 मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कुणाल खाडिलकर, आकांक्षा काळे आणि राहुल बारहाते यांनी एमआयटी सीओईचे प्रतिनिधित्व केले. 36 तासांच्या या परीक्षेत त्यांच्या किलर कोड या संघाने आपली सृजनशीलता दाखवून कमीत कमी खर्चाचा प्रकल्प सादर केला. त्यामध्ये जीओटॅगिंग, साउंड क्यूआर, कॉम्प्यूटर व्हिजन आणि मशिन लर्नींगचा उपयोग, पार्किंगस्पेस अॅव्हेलेबिलिटी अॅण्ड मॉनिटरिंग इन युनिव्हर्सिटी कॅम्पस ही समस्या सोडविण्यासाठी आपले कौशल्य दाखविले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड आणि प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांच्या पाठबळामुळे हे यश संपादन करता आले, असे उद्गार स्पर्धक विद्यार्थ्यांनी काढले.