सिंगिग सुपरस्टार स्पर्धेत मयुरी अत्रे प्रथम

0

रोटरी क्लब ऑफ निगडीचा उपक्रम
आकुर्डी : रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यावतीने रोटरी सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा घेण्यात आली. सिंगिंग सुपरस्टार स्पर्धेत मयुरी अत्रे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेस उत्स्फूर्त सहभाग लाभला. आकुर्डी येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 78 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी 30 स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यात 8 स्पर्धकानी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अलबेला सजन आयो रे, ढोलकीच्या तालावर, दिल से रे, बहुत प्यार करते है तुमको सनम, मैं फिर भी तुमको छाऊंगा या अशा अनेक गाण्यांनी स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. परीक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्‍या मयुरी अत्रे हिला स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रोख आणि प्रशस्तीपत्रक तर द्वितीय क्रमांक निहाल मयेकर याला 15 हजार रुपये आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमाक निधी हेगडे यांना 10 हजार रोख व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तर शेवटच्या चार क्रमांकाना उत्तेजनार्थ प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजेश दातार, संदीप उबाळे, कल्याणी देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष जयसिंघानी यांनी केले. सूत्रसंचालन रवी हिरेमठ, रवी पिल्ले यांनी केले. आभार गीता खांडकर यांनी मानले.