रावेर । तालुक्यातील सिंदखेड येथील सरपंच यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज दुपारी येथील पंचायत समिती सभापती यांच्याकडे आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. याबाबत वृत्त असे की सिंदखेड येथील सरपंच सुवर्णा प्रमोद पाटील यांच्या सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पंचायत समिती सभापती माधुरी नेमाळे यांना पदाचा राजीनामा दिला. यावेळी प्रमोद पाटील, श्रीकृष्ण पाटील, गोपाळ नेमाळे, संजय पाटील, विजया पाटील आदी उपस्थित होते.