कार घेवून जातांनाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
जळगाव- शहरातील सिंधी कॉलनी येथे व्यापारी कैलास लख्मीचंद चिमनानी वय 45 यांनी नेहमीप्रमाणे रात्री घराबाहेर उभी केलेली 2 लाख रुपये किंमतीची कार चोरट्यांनी लांबविल्याची घटना 26 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. दरम्यान गल्लीतील एका रहिवाशाच्या सीसीटीव्हीतमधये कार घेवून जातांना तसेच कारमध्ये पांढरी मारोती कार असल्याचे दिसून येत आहे.
सिंधी कॉलनी येथे टीएम.एम.नगर येथे प्लॉट नं 98 ब येथे व्यापारी कैलास लख्मीचंद चिमनानी हे पत्नी, मुलगी, मुलगा अशासह राहतात. त्यांचा तेल विक्रीचा व्यवसाय आहे. 25 रोजी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास चिमनानी यांनी त्यांची स्विफ्ट डिसायर कार (क्र. एम.एच.19 बी.यू.2123) घराबाहेर उभी केली. कार लॉक तसेच स्टेअरींगही लॉक केले. रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जेवण केले व झोपून गेले. 26 रोजी सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालो असता, कार जागेवर नव्हती.
सीसीटीव्हीत प्रकार कैद
कैलास चिमनानी यांनी भाऊ दिपक, शेजारील अमरलाल बालाणी, सुनील राजपाल याच्यासह कारचा परिसरात शोध घेतला. मात्र कार मिळून आली नाीह. यानंतर सर्वांनी गल्लीतील शिवम जाधवानी यांचे घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले. त्यात 26 रोजी रात्री 3.18 मिनिटांनी कार राष्ट्रीय महामार्गाकडे जात असतांना दिसून येत आहे. तर चिमनानी यांच्या कारच्या मागे एक पांढर्या रंगाची मारोती कार जातांना दिसून येत आहे. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर चिमनानी यांनी 27 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.