सिंधूचा सायनावर मात

0

नवी दिल्ली। इंडियन ओप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्या भारताच्या दोन्ही अव्वल बॅडमिंटनपटू उभ्या ठाकल्या होत्या.या सामन्यात कोण जिकणार याकडे सर्व खेळाडूचे लक्ष लागले होते. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. सिंधूने 16-21 आणि 20-22 असा सरळ दोन सेटमध्ये सायनावर विजय संपादन करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. आजच्या सामन्यात देशाच्या अव्वल बॅटमिंटनपटू समोरासमोर आल्या होत्या सामना सुरू झाल्यावर पहिल्या सेटमध्ये सायना निष्प्रभ ठरली. पण दुस-या सेटमध्ये खेळ उंचावत तिने चांगला प्रतिकार केला. दुसरा सेट सायना जिंकेल असे वाटत असतानाच शेवटच्या क्षणी तिने काही चुका केल्या. ज्याचा फायदा उचलत सिंधूने तिच्यावर दोन गुणांच्या फरकाने मात केली.

आजी-माजी शिष्येंना खेळतांना बघितले प्रशिक्षकाने
या सामन्याच्यावेळी कोर्टवर सिंधूचे प्रशिक्षक असलेले गोपीचंदही उपस्थित होते. ते यापुर्वी सायनाचे प्रशिक्षक होते. सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर, सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा 21-14, 21-12 धुव्वा उडवून तर सिंधूने जपानच्या साएना कावाकामीचे कडवे आव्हान 21-16, 23-21 परतवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. प्रशिक्षक गोपीचंद समोर कोर्टावर आजी माजी शिष्यांमध्ये सामना रंगला होता.त्यामुळे प्रशिक्षक गोपीचंद यांना दोन्ही शिष्यांचे प्रदर्शन पाहावयास मिळाले. प्रशिक्षक गोपीचंद यांचे मार्गदर्शनाखाली या खेळाडूंना मिळाले असून त्यांच्या तालमीत त्या तयार झाल्या आहे. त्यामुळे प्रशिक्षकांना एका डोळ्यात आनंद तर दुसर्‍या डोळ्यात दुख असा अनुभव आला असले असे चित्र दिसत होते.

सिंधू जबरदस्त फॉर्मत
सायनाच्या गाठीशी प्रचंड अनुभव असल्याने ती सिंधूवर मात करेल असे बोलले जात होते. मात्र सिंधूने जबरदस्त फॉर्मच्या जोरावर आक्रमक खेळी करून सायनाला नमवले. उपांत्य फेरीत सिंधूसमोर कोरियाच्या सूंग जी-ह्यू हिचे आव्हान असणार आहे. शनिवारी हा सामना होणार असून अंतिम फेरीत धडक मारण्याची सिंधूला सुवर्णसंधी आहे.