दुबई : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे दुबई सुपर सीरिज जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले आहे. चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा 15-21, 21-12, 19-21 असा पराभव करत जेतेपदावर पटकावले. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.