सिंधूच्या पराभवासह भारताचे ‘आशियाई’त आव्हान संपुष्टात

0

वुहान (चीन) । आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. पी. व्ही. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या हे बिंगजीयाओकडून पराभव पत्करावा लागला. सिंधूला आठवे मानांकनप्राप्त चीनी खेळाडूने 21-15, 14-21, 22-24 असे हरवले. सिंधूच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या सिंधूने चिनी खेळाडूविरुद्ध आक्रमक खेळ केला. पहिला गेम 21-17 असा जिंकला. 20 वर्षीय बिंगजियाओने यानंतर सामन्याचा नूरच पालटवला. बिंगजीयाओने 21-14 असा गेम घेत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तिसरा गेम 20-20 असा बरोबरीत आला. सिंधूला केवळ दोनच गुण घेता आले, तर बिंगजीयाओने चार गुण घेत गेमसह सामनाही जिंकला.