गोल्ड कोस्ट । सुदीरमन कप मिश्र टीम चॅम्पियनशिपच्या पहिल्या लढतीत भारतीय संघाला डेन्मार्कविरुद्ध 1-4 ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू च्या सलग दुसर्या विजयाने भारताचे आव्हान कायम राहिले आहे पी.व्ही.सिंधूने महिला एकेरीत एफ.फित्रियन विरुद्ध 21-8, 21-19 असा विजय प्राप्त केला. या विजयासह इंडोनेशियावर 3-1 अशा मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे.
सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. सिंधूसोबतच एस.रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनीही विजयाची नोंद करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. दुसर्या बाजूला अजय जयराम याचा 12-21, 7-21 असा मानहानीकारक पराभव झाला. पुरूष दुहेरीत मनू अत्री आणि बी.सुमेथ रेड्डी यांचा माथियास बोए, कार्स्टन मोगेनसेन जोडीने 21-17, 21-15 असा पराभव केला. पी.व्ही.सिंधूने मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत भारताचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.