सिंधूसह भारताचेही चीन ओपनमधील आव्हान संपले

0

फुजोऊ । यजमानांच्या गाओ फांगजेईकडून पराभूत झाल्यामुळे ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूसह भारताचेही चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीतील 38 मिनिटे खेळल्या गेलेल्या या सामन्यात सिंधूला आपला करिष्मा दाखवता आला नाही. 19 वर्षीय फांगजेईने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सिंधूचा एकतर्फी लढतीत 21-11, 21-10 असा पराभव केला. याआधी सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत पराभूत झाले होते.