सिंहगड रोड : खडकवासल्यातील वाढत्या विसर्गामुळे विठ्ठलवाडी, आनंदनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये नदीचे पाणी शिरण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नगरसेविका मंजुषी नागपुरे यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे निरीक्षक विष्णू जगताप व महापालिका अधिकारी यांच्यासमवेत नदीपात्राजवळ असलेल्या सोसायट्यांची पाहणी केली.
विठ्ठलवाडी, आनंदनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये धरणातून होणार्या वाढत्या विसर्गामुळे नदीचे पाणी शिरण्याचा संभाव्या धोका आहे. यामुळे नागपुरे आणि अधिकार्यांनी असा धोका असणार्या सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केले, तसेच संभाव्य धोक्यामध्ये कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. पोलीस तसेच नागरिकांनाही सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी दीपक नागपुरे, निरंजन कोळी, प्रणव कुकडे, विजय मानकर, सौरव मंडावले, मंगेश बुजवे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.