चाळीसगावचे डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे यांच्या लेखाचा दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात समावेश
चाळीसगाव । शहरातील पहिल्या रुग्णालयाचे संस्थापक काकासाहेब डॉ.वामन गणेश पूर्णपात्रे यांनी 1973 साली आपल्या राहत्या घरी सिंहिणीचे पिल्लू पाळले होते. वर्षभरातमोठी झालेल्या सिहिणीला नंतर त्यांनी पुण्याच्या पेशवे उद्यानात पाठविण्यात आले. तिला निरोप देताना डॉक्टर साहेबांच्या मनात झालेली धुसमट त्यांनी सोनाली या पुस्तकातुन व्यक्त केली. याचाच एक भाग नव्याने प्रसिद्ध झालेल्या दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे सिहिण सोनालीच्या गतस्मृतींना उजाळा मिळाला आहे. चाळीसगाव येथील घाटरोड वर नदीकिनारी संगम हॉस्पिटल सर्वांच्या नजरेस पडते. शहरातील या पहिल्या रुग्णालयाचे संचालक डॉ.पूर्णपात्रे हे वन्यप्राण्यांवर प्रेम करणारे एक वन्यजीव अभ्यासक होते. त्यांनी 29 ऑगस्ट 1973ला घरी सिहिणीचे एक पिल्लू आणले त्याचा सांभाळ केला. त्या काळी शिकारीचा छंद असलेल्या या परिवाराकडे बंदुकीचा परवाना असल्याने उपद्रवी प्राण्यांच्या शिकारीसाठी डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे यांना हमखास बोलाविले जात होते.
सिंहिणीचे पिल्लू आणले घरी
पुण्याला आपल्या मित्र डॉ. चित्रेंकडून एक सिहिणीचे पिल्लू घरी आणल तिचे नांव सोनाली ठेवले. तिला वाढविले घरातील सदस्यांसह रुग्णालयातील कर्मचार्यांचा तिच्याशी लळा वाढला. रुग्णालयात येणार्या रुग्णांना देखील सोनालीचे खुलेआम दर्शन होत असे तिला 31 मार्च 1974 रोजी पुण्याला पेशवे उद्यान येथे पोहचविण्यात आले. डॉ पूर्णपात्रे यांनी सोनालीच्या आठवणी तिच्या जडणघडणीत आलेले अनुभव सोनाली या पुस्तकात जनतेसमोर खुले केले. त्याकाळी हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले होते. 1983 या पुस्तकातील एक भाग तेव्हा नववीच्या अभ्यासक्रम मात समाविष्ट करण्यात आला होता. मात्र नंतरच्या बदलात हा धडा काढून टाकण्यात आला होता. मात्र दोन दिवसापूर्वी तोच धडा दहावीच्या मराठीच्या कुमारभारती या नवीन पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्याने सोनालीच्या आठवणी वाचकां समोर आल्या आहे. त्यामुळे चाळीसगावकर सिहिण सोनालीची आज तालुक्यासह शहरात मोठी चर्चा होती. या पुस्तकात सोनालीच्या जीवनपट डॉ.पूर्णपात्रे यांनी मांडला आहे. तो राज्यातील सर्व वाचकांना भावला होता.
आठवणींना उजाळा – डॉ.सत्यजित पूर्णपात्रे
मी नववीच्या वर्गात शिकत असतांना मला देखील हा धडा अभ्यासाला होता. त्यानंतर तो नियमानुसार वगळण्यात आला. मात्र आज तो नव्याने समाविष्ट झाल्याने काकासाहेबांच्या अप्रतिम लेखन महाराष्ट्रीय वाचक तसेच विद्यार्थ्यांना समोर आलेले आहे. वन्यप्राण्यांची विषयींचे प्रेम या पाठामुळे वाढीस लागणार आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या मध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असते. ही सोनाली च्या रूपातील सत्यकथा माणसाने वन्यप्राण्यांवर प्रेम करावे,अशी प्रेरणा दायी आहे. ही भावना डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे यांचे नातू तथा चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे संचालक डॉ.सत्यजित पूर्णपात्रे यांनी ’जनशक्ती‘शी बोलतांना व्यक्त केली आहे.