सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून दारूची वाहतूक ; आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- चंद्रपूर राज्यात दारूबंदी असताना रेल्वेद्वारे चोरटी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर 17038 हिसार-सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक सातमधून पाच बॅगांमधील 22 हजार 954 रुपये किंमती टँगो पंच दारू भुसावळ स्थानकावर सोमवारी सायंकाळी सव्वा वाजता जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी राजू सुरेश भट (21, सिंधी कॉलनी, जळगाव) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध जितेंद्र वामनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय बबन शिंदे करीत आहेत.