जळगाव । सुगरण पक्ष्यांची संख्या मोठ्याप्रमाणात कमी कमी होत आहे. सुगरण पक्ष्याची संख्या का घटत व दूर्मिळ होत आहे. हा धोका लक्षात घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या कॉमन बर्ड मॉनेटरींग प्रोग्रॅम अंतर्गत 4 ते 11 जून महाराष्ट्रात सुगरण पक्ष्यांची गणना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वाढते शहरीकरण, चौपदरीकरण, उद्योगांमुळे जंगल तोड होत आहे. व शेतजमिनी नष्ट होत आहे. त्याचे परिणाम पशु पक्ष्यांची संघ्या कमी होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यासाची गरज आहे. या गणनेत पक्षी-पशु प्रेमी संघटना,संस्थांनी सहभाग घ्यावाच पण नागरिकांनी ‘सिटीझन साईन्टीस्ट’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन बी.एन.एच.एस.च्या कॉमन बर्ड मॉनेटरींग प्रोग्रॅम चे जिल्हा समन्वयक राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.
पक्षीमित्रांना नागरीकांकडून सहकार्याचे आवाहन
अधिक माहितीसाठी शिल्पा गाडगीळ यांच्याशी संपर्क केल्यास गणनेची संपूर्ण पद्धत, गणनेचा मार्ग, गणना कशी भरायची यावर माहिती दिली जाईल. सुगरण पक्षी शेतकर्यांचा मित्र पक्षी आहे. सुंदर घरटे बांधण्यासाठी प्रसिद्ध सुगरण पक्ष्याचा विणीचा हंगाम मे ते सप्टेंबर हा असतो .या काळात आपल्या पक्षाची नीट वाढ व्हावी म्हणून पिकावरील आळ्या व कीटकांना पकडून आपल्या पिल्लांना खाऊ घालत असतो.त्यामुळे किडी वर नियंत्रण राखले जाते व पिकाचे किडीपासून संरक्षण होते. हे कीड नियंत्रणाचे महत्व लक्षात घेऊन बी.एन.एच.एस. नी सुगरण पक्ष्याची गणना हाती घेतली आहे. या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध संघटना, संस्थांनी, नागरिकांनी, शेतकरी बंधू-भगिनींनी सहभाग घ्यावा. आपण ज्या क्षेत्रात सहभाग घेणार असाल त्या क्षेत्रावर गुगल अर्थने 2 किमी बाय 2 किमीचे चौरस पडून ट्रांझिट लाईन ठरवून दिली जाईल व एका पद्धतीने गणनेची नोंद कशी ठेवायची यावर माहिती दिली जाईल असल्याचे शिल्पा व राजेंद्र गाडगीळ कळवितात.