सिद्धार्थ “नो मोर” सिंगल!

0

मुंबई: आलिया भटशी ब्रेकअप नंतर सिद्धार्थ मल्होत्रा एकटा झाला होता. मात्र “किसीना किसीको है बनाया हर किसी के लिये” राबता गाण्यातले हे बोल सिद्धार्थच्या आयुष्यातही खरे ठरत आहे असं दिसून येत आहे. सध्या सिद्धार्थच्या आयुष्यात एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याची चर्चा होत आहेत.

सिद्धार्थचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. आलिया भट्ट त्यानंतर जॅकलिन फर्नांडिस यांचेही नाव चर्चिले गेले. आता त्याच्या आयुष्यात नवी एन्ट्री मारणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे समजतेय.

माध्यमांशी संवाद साधतेवेळी सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या रिलेशनशिपविषयी विचारण्यात आले. त्या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला, ‘सध्यातरी मी माझ्या कामासोबतच रिलेशनशिपमध्ये आहे. इतर गोष्टींसाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाही. पण जिथे धुरं दिसतं तिथे नक्कीच आग लागलेली असते हेही तितकेच खरे.