सिद्धार्थ महाबोधी विहारचे भूमिपूजन

0

शहादा । शहाद्यात नियोजित सिद्धार्थ महाबोधी विहारचे भूमिपूजन व खिरदानाचा कार्यक्रम दि.10 मे रोजी बुद्धपोर्णिमाच्या दिवसी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहादा शहरालगत कुकडेल शिवारात मनरद रस्त्यावर बौद्ध सिवारातील जागेवर बौद्धधम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सुंदर असे बौद्ध विहार बांधले जाणार आहे. या जागेचे सुशोभीकरण व वृक्षारोपण करून दि.10 मे रोजी सकाळी 10 वाजता भारतीय महासभचे अध्यक्ष भन्ते आनंद यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.