सिनेट निवडणुकीत बोगस मतदानाचा आरोप

0

मतमोजणी रखडली; रात्री 8 पर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी झालेल्या मतमोजणीच्या सुरूवातील बोगस मतदानाचा आरोप झाल्याने वाद निर्माण झाला आहे. आज या निवडणुकीची उत्तर विद्यापीठात मतमोजणी होती. मात्र, सकाळपासून वैध अवैध मते तपासली जात असताना जामनेरात महिलांनी सासर व माहेरचे नाव बदलाबाबत भरून दिलेले घोषणापत्र बोगस असल्याचा आरोप विद्यापीठ परिवर्तन मंच व विद्यापिठ विकास आघडीतर्फे करण्यात आला आहे. तब्बल 100 घोषणापत्र कुणीदुसर्‍यांनी भरून बोगस मतदान केल्याचा हा आरोप असून गेल्या एक ते दोन तासांपासून हा वाद सुरू आहे. आता वाद घालण्यापेक्षा मतदान केंद्रावरच असा प्रकार लक्षात आणून अडवायला हवं होत, अस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणणे आहे. दरम्यान, या वादात मतमोजणी बराच वेळ रखडली असून आता काही वेळाने मतमोजणीला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, रात्री आठ वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता असून उद्या सकाळी अकरा ते साडे अकरापर्यंत सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे.