औरंगाबाद : चौथीमध्ये शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्याघरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी वाळूज परिसरातील सिडको महानगर १ येथे सदरील घटना घडलीआहे. विकास मछिद्र पवार असे मृत मुलाचे नाव असून ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता. सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात विकासने गळफास घेतला आणि यात त्याचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.