सिमी खटल्यात रामकृष्ण पाटील यांची महत्वाची भुमिका!

0

जळगाव। सिमी खटला आपण चालविणार याची कल्पना केली नव्हती. परंतु तो चालविण्याची जबाबदारी आली. या खटल्याचे भरपूर दस्ताऐवज होता. या गुन्हयासंदर्भात रामकृष्ण पाटील हे तज्ञ माहितगार होते. वेळोवेळी त्यांना फोन करून कोर्टात बोलवून घेतले. ते या गुन्हयाच्या तपासातील अधिकार्‍यांचे संभाषण करून देत होते. इंदोर सिमीतील आरोपी, मुंबई एटीएसचे जजमेंट उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका राहिली. पोलीसांकडून या खटल्यात कोणत्याही अडचणी जाणवल्या नाहीत. रामकृष्ण पाटील यांचा सत्कार करावा, असे मला वाटत होते. तो मी केला असे मत जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी व्यक्त केले.

सिमी गुन्हयात चोख कर्तव्य बजावणारे पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांचा बुधवारी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांच्यातर्फे शाल,श्रीफळ,पुष्प आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक सरकारी वकील सुरेंद्र काबरा, अ‍ॅड. नितीन देवराज, अ‍ॅड.रमाकांत सोनवणे, अ‍ॅड. प्रदिप महाजन आदी उपस्थित होते. तर मी माझे कर्तव्य पार पाडले, त्यासाठी सत्कार करणे मला योग्य वाटत नाही, अशी भावना पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

एमआयडीसी पोलीस स्टेशनला सिमीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सेशन केस 173/06 हा कोर्टात दाखल खटल्यात परवेजखान रियाउददीन व इतरांवर दोषारोप ठेवण्यात आला होता. या खटल्यात मुददेमाल, दस्ताऐवज सांभाळण्याचे महत्वपूर्ण कामगिरी पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांनी पार पाडली होती. कोर्टात जो जो दस्ताऐवज लागला तो त्यांनी सरकारी वकीलांना तत्काळ उपलब्ध करून दिला. या गुन्हयात तपासाधिकार्‍यांची साक्ष कामी त्यांच्याशी संपर्क करणे आवश्यक होते. त्यासाठीही त्यांनी तत्काळ सहकार्य केले. या खटल्यात दोघा आरोपींना दहा वर्षाची शिक्षा लागली होती. हा खटला जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी चालविला होता. खटल्यात पोलीसांचे उत्तम सहकार्य मिळाल्यामुळे खटला गतीने चालला. तसेच दस्ताऐवज, पुरावे इत्यादीमुळे शिक्षा लागली. कर्तव्य चोखपणे पार पाडल्याबददल ड. ढाके यांनी पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांचा त्यांच्याच कार्यालयात छोटेखानी सत्कार केला.

मी कर्तव्य पार पाडले
सत्काराला उत्तर देताना पोहेकॉ रामकृष्ण पाटील म्हणाले, सत्कार करणे मला योग्य वाटत नाही, मी माझे कर्तव्य पार पाडले. ती माझी डयूटीच होती. साहेबांनी फोन केला तर त्यांना माहिती देणे माझे कर्तव्य ठरते. त्यामुळे त्यांना मी माहिती दिली. साहेबांनी आज माझा सत्कार घडवून आणला, त्याबददल जिल्हा सरकारी वकीलांचे मी आभार मानतो, असे ते म्हणाले. सुत्रसंचालन सरकारी वकील अ‍ॅड. नितीन देवराज यांनी केले तर मानपत्राचे वाचन सरकारी वकील अ‍ॅड. रमाकांत सोनवणे यांनी करून आभार मानले.