सिमेंटच्या शहरात पक्ष्यांच्या अनेक जाती तग धरून

0

पिंपरी-चिंचवड : शेती आणि वनराई नष्ट होवून सिमेंटचे जंगल झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अजूनही अनेक पक्षी आडोसा धरून स्थायिक झाल्याचे अभ्यासकांना निरिक्षणांती आढळून आले. यामध्ये मैना राघू, सातभाई, तांबट, गायबगळा, रातबगळा, लाजरी पानकोंबडी या पक्ष्यांचा समावेश आहे. हिवाळा हा वीण हंगाम असल्याने उंच झाडांच्या फांद्यावर घरणी विणण्यात जोड्या मश्गूल असल्याचेही दिसले…पिंपरी चिंचवड येथील अलाइव्ह संस्थेच्या वतीने रविवारी पक्षीशास्त्र अभ्यासक डॉ. सलीम अली जयंतीनिमित्त पक्षीनिरीक्षण आयोजित केले होते. चिंचवड थेरगाव बोटक्लब येथे सकाळी साडेसात ते दहापर्यंत झालेल्या विशेष शिबिरात पर्यावरणप्रेमी आबालवृद्धांनी भाग घेतला.

सर्वकाही पक्ष्यांविषयी
निसर्ग संवर्धनाची चळवळ आणखी व्यापक व्हावी, यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटला. या वेळी पक्ष्यांच्या जाती, इथे आढळणारे पक्षी तसेच परदेशातून येणारे स्थलांतरित पक्षी याबाबत माहिती देण्यात आली. मैना राघू, सातभाई, तांबट, गायबगळा, रातबगळा, लाजरी पानकोंबडी हे पक्षी या ठिकाणी आढळून आले. प्रत्येक पक्ष्याचे वैशिष्ट्य, त्यांच्या नावांचा इतिहास, ते घरटी कशी बनवतात, त्यावरून ऋतुचा येणारा अंदाज, खाद्य, आवडीनिवडी, स्थलांतर…याविषयीची माहिती उमेश वाघेला यांनी दिली.सूत्रसंचालन समीर पाटील यांनी केले.