माद्रिद । माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत रोमानियन सिमोना हॅलेपने विजेतेपदावर नाव कोरले. संघर्षमय अंतिम लढतीत हॅलेपने फ्रान्सच्या क्रिस्टिना मेल्डनव्हिकला 7-5, 6-7, 5-2 असे पराभूत करताना जेतेपदावर नाव कोरले. हॅलेपचे या वर्षातील पहिले जेतेपद तर माद्रिद ओपनमधील दुसरे जेतेपद ठरले आहे. जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानी असलेल्या फ्रान्सच्या क्रिस्टिनाने यावर्षी प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. याआधी, हॅलेपने तीन वेळा माद्रिद ओपनच्या अंतिम लढतीत धडक मारली आहे. 2014 मध्ये तिला उपजेतेपदावर समाधाना मानावे लागले होते. गतवर्षी स्लोवाकियाच्या सिबुलकोव्हाला पराभूत करत जेतेपदावर कब्जा केला होता. हॅलेपचे हे माद्रिद ओपनमधील सलग दुसरे जेतेपद ठरले आहे.