‘सिम्बा’चा बॉक्स ऑफिसवर धमाल; आजपर्यंत इतकी केली कमाई !

0

मुंबई-रणवीर सिंग आणि सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ बॉक्सवर धमाल करत आहे. चित्रपट रिलीज होऊन ९ दिवस झाले. ९ व्या दिवशीही चित्रपटाकडून जोरदार कमाई सुरु आहे.

पहिल्याच दिवशी २०.७२ कोटीची कमाई करणाऱ्या ‘सिम्बा’ने नवव्या दिवशीही १३.३२ कोटी कमावले. ‘सिम्बा’ची एकूण कमाई १७३.१५ कोटींच्या घरात पोहोचली. विशेष म्हणजे, रणवीरच्या या चित्रपटाने स्वत:च्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे.