नेरुळ : सिवूड्स (से. 42 ए) येथील डी मार्टमुळे परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यामुळे येथील राहिवंशाना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पालिका आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. डी माटकडेे येणार्या ग्राहकांसाठी गाड्या पार्क करण्यासाठी कोणतीही सुविधा केलेली नाल्यामुळे येथे कशाही गाड्या पार्क केलेल्या असतात.तर डी मार्ट ला लागून असलेल्या पदपथावर कित्येक दुचाकी उभ्या केलेल्या दिसतात त्यामुळे हा पदपथ पालिकेने डी मार्टला आंदण दिला आहे का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे पालिकेच्या पार्किंगबाबतच्या धोरणांचा अभाव येथे पाहायला मिळत आहे.
सिवूड्स येथील डी मार्ट हे सदैव गजबजलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईत असलेल्या डी मार्टच्या चेन माधव या डी मार्टमध्यव येणार्यांची संख्या अधिक आहे.नेरुळ, सिवूड्स, बेलापूर मधून येथे नागरिक खरेदीसाठी येतात. इतर दुकाने किंवा मॉल पेक्षा स्वस्त दरात मिळणार्या वस्तू म्हणजे येथील आकर्षण. त्यामुळे येथे दुचाकी आणि चारचाकी घेऊन येणार्यांची संख्या अधिक असते.
डी मार्ट हा सिवूड्समधील सर्वात महत्वाचा अशा भागात वसलेले असल्यामुळे आणि येथून चारही दिशांना म्हणजेच सिवूड्स रेल्वे स्थानक, बेलापूर, पामबीच, नेरुळ आशा विविध भागांत जात येत आल्यामुळे येथे सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र येथे पार्क केलेल्या गाड्यांमुळे येथे दररोज आणि सुट्ट्यांच्या दिवशी वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असल्याचे पाहण्यास मिळते. तर याच डी मार्टच्या बाजूलाच रहिवाशी आणि डॉन बोस्को शाळा असल्याने मुलांना घेऊन जाण्यासाठी येणारे पालक स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन येत असतात. तर काही मुले ही स्कुल बस मधून घरे जातात त्यामुळे देखील येथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. तर येथील राहिवंशाना देखील गाड्यांच्या सतत वाजणार्या हॉर्नमुळे त्रास होत होत आहे.
मुळात पालिकेने याकडे गांभीर्याने पाहायला हवे. परवानगी देताना आधी त्या प्रकल्पात पुरेसे पार्किंग आहे का ते प्रत्यक्षात पाहणे गरजेचे आहे. तरीसुद्धा माही देखील डी मार्टजवळ अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्यावर त्याला दंड अकारतो. त्यामुळे येथे काही प्रमाणात चाप बसलेला आहे. तसेच पालिकेने या ठिकाणी पे अँड पार्क चालू केलेले असल्याची माहिती नेरुळ वाहतूक पोलिस शाखेचे एपीआय श्री. पवार यांनी दिली.
आम्ही वेळोवेळी वाहतूक पोलिसांशी याबाबत संपर्क साधता आहोत. आतापर्यंत पाच पत्र लिहिलेली आहेत. मेल पाठवलेले आहेत. मात्र कोणतही प्रतिसाद मिळालेला नाही. या याठिकाणी आम्ही नो पार्किंग झोन, वन वे पार्किंग आणि पे अँड पार्क आशा तीनही गोष्टी तयार केलेल्या आहेत. मात्र तरी नागरिक अनधिकृतपणे गाड्या उभ्या करत असतील तर त्यावर कारवाई करणे वाहतूक विभागाची जबाबदारी आहे.
अंकुश चव्हाण
अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई मनपा