भुसावळ : शहरातील रेल्वे कर्मचार्यांच्या वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोर्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचार्याच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवित दागिणे चोरीस गेल्याची घटना घडली होती. यामुळे कर्मचार्यांच्या परिवारात असुरक्षिततेची भावना वाढीस लागत असून वसाहतींमध्ये सुरक्षा प्रदान करण्यात यावी या मागणीसाठी सीआरएमएसतर्फे डीआरएम कार्यालयावर मंगळवारी सायंकाळी मोर्चा काढण्यात आला.