सीईटी’ वेळापत्रक जाहीर

0

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी-2019’चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांसाठी एमएच-सीईटी 2 ते 13 मेमध्ये होणार आहे.

यावर्षी पहिल्यांदाच परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. एमबीए, एमसीए, विधी अभ्यासक्रम, बी.ई, बी. टेक, बी.फार्म, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (पदवी आणि पदव्युत्तर), आर्किटेक्चर, बीपीएड, एमपीएड, बीएड, एमएड, बीए व बीएसस्सी इंटिग्रेटेड कोर्स अशा सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्याwww.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेआयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.