सीए अनिल शाह यांचे जीएसटी विषयी मार्गदर्शन

0

जळगाव। 1 जुलै पासून केंद्र शासनाने जीएसटी (वस्तु व सेवाकर) लागु केला आहे. जीएसटी लागु झाल्यापासून सामान्य नागरिकांमध्ये महागाई वाढेल अशी संभ्रमावस्था आहे. परंतु जीएसटीमध्ये करावर कर आकारणी नसेल. तसेच खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांवर भरलेल्या संपूर्ण सेट ऑफ मिळणार आहे.

त्यामुळे येत्या 3 महिन्यात वस्तूंच्या किंमती तीन टक्कांनी स्वस्त होतील असा विश्‍वास सीएस अनिल शाह यांनी व्यक्त केला आहे. आयएमआर व्यवस्थापन महाविद्यालयात शुक्रवारी 11 रोजी जीएसटी विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. प्रा.श्‍वेता चोरडीया यांनी सूत्रसंचालन केले. निधी कोठारी यांनी आभार मानले. प्रा.शुभदा कुलकर्णी, प्रा.बी.जे.लाठी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.