सीजीच्या विजयात कार्ल सेराओ चमकला

0

मुंबई। निर्णायक लढतीतील कार्ल सेराओच्या विजयामुळे कॅथलिक जिमखान्याच्या सीजी देकापिटारे संघाने मंडपेश्‍वर सिवीक फेडरेशनच्या टफ मेन संघाचा 621-611 असा पराभव करत चेंबुर जिमखाना आयोजित मुंबई बिलीयर्डस लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. उपांत्य फेरीच्या लढतीत मेल्वीन मॅस्कारेहन्सने टफ मेन संघाच्या मेहुल सुतारीयावर 621-611 असा विजय मिळवत कॅथलिक जिमखान्याला आघाडी मिळवून दिली होती. पण पुढच्याच लढतीत रोहन जांबुसरीआने डेरेक सिप्पीचा पराभव करत सामन्यातील रंगत वाढवली. दुसर्‍या लढतीत राहुलने डेरेकवर 200-101 असा विजय मिळवला होता.

तसर्‍या सामन्यात कार्लने चंदू कंसोदरीआवर 200- 187 असा विजय मिळवत संघाचे अंतिम फेरीतले स्थान निश्‍चित केले. अंतिम लढतीत त्यांचा सामना खार जिमखान्याच्या फोर अ‍ॅण्ड हाफ मेन संघाला हरवणार्‍या माटुंगा जिमखान्याच्या पार्टीसिपंट्स संघाशी होईल. दुसर्‍या उपांत्य फेरीत खार जिमखान्याच्या रिषभ ठक्करने माटुंगा जिमखान्याच्या शैलेश रावचा 200- 55 असा पराभव करत आघाडी मिळवली. दुसर्‍याच फेरीत माटूंगा जिमखान्याच्या अंकित ठक्करने स्पर्श पेहरवानीवर 200-107 असा विजय मिळवत संघाला 1-1 असे बरोबरीत आणले. शेवटच्या सामन्यात अनुभवी देवेंद्र जोशीने इशप्रितसिंग चढ्ढावर 152-126 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.