जळगाव। रेशन धान्य, रॉकेलचा काळाबाजार थांबवा, रोजगार हमी योजनेचे कामे गावोगावी सुरू करा, बांधकाम कामगारांना पाच हजाराचे अनुदान द्या, कामगार कल्याण मंडळाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी सेंट्रर ऑफ इंडियन ट्रेड, फेरीवाले कामगार, शेतमजूर युनीयन, बांधकाम कामगार, घरकामगार आदी संघटनांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता आकाशवाणी चौकात जेलभरो आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास 9 जून जिल्हा दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा या संघटनांनी या आंदोलनाव्दारे दिला आहे. दरम्यान, संघटनामधील असंख्य सदस्यांनी आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
अन् मोर्चाला सुरूवात
महात्मा गांधी उद्यानात सकाळी 11 वाजता महिला व पुरूष कामगार एकत्र जमल्यानंतर कामगारांची सभा घेण्यात आली. सभेला कॉ़ विजय पवार, कॉ़ प्रकाश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यानंतर 11.30 वाजेच्या सुमारास उद्यानापासून मोर्चाला सुरवात करण्यात आली. यानंतर आकाशवाणी चौकात पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतले. व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. मोर्चात हनीफ शेख, युनूस पटेल, रमेश मिस्तरी, भरत मिस्तरी, कॉ़भगवान कोळी, जाकीर मिस्तरी, अजित मिस्तरी, कमलबाई गोंधळी, सुनील सोनार, सुनील जाधव, मांगीलाल प्रजाप्त, शंकर चौधरी, दिनेश हिंगणे, शांतीलाल चौधरी, राधेशाम पाटील, सुनील पाटील, रवी तेली, अर्जून कहेळकर, चेतन बेनल, किशोर प्रजापत, गोकूळ पाटील, शाहरूख पटेल यांच्यासह हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घोषणांनी परिसर दणाणला
सीटू जिंदाबाद, बांधकाम युनीयन जिंदाबाद, मजदूर एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद, भांडवलशाही आणून पाडा, रस्त्यावरील हॉकर्सला कारवाई करून बेरोजगार करू नका, कामगार कायद्यातील बदल हाणून पाडा, अधिकारांसाठी हल्लाबोल, सरकारचा धिक्कार असो अशा मोर्चात सहभागी कामगारांच्या घोषणांनी लक्ष वेधले होते. महात्मा गांधी उद्यान ते आकाशवाणी चौकापर्यंतचा परिसर कामगारांच्या घोषणांनी दणाणून सोडला. कामगारांच्या रास्ता रोको व जेलभरो आंदोलनामुळे रामानंदनगर, जिल्हापेठ, शहर पोलीस या पोलीस ठाण्यांमधील कर्मचार्यांना आकाशवाणी चौकात पोलीस वाहनांसह तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या गर्दी मुळे कामगारांपेक्षा पोलीस जास्त असे चित्र घटनास्थळी पहावयास मिळाले.
आंदोलकांना अटक व सुटका
कामगार संघटनां आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करणार होते़ मात्र आकाशवाणी कार्यालयाजवळ पोलिसांनी त्यांना अडविले़ याठिकाणी कामगारांनी घोषणाबाजी केली़ पोलिसांनी सर्व आंदोलन कर्त्यांना पोलीस वाहनातून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्वांची सुटका करण्यात आली.
या आहेत मागण्या
बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचे लाभांचे वाटप झाले पाहिजे, जीवनाश्यक वस्तूंवरील महागाई कमी करा, जीवनावश्यक वस्तू बीपीएल व केशरी कार्डधारकांना मिळाल्याच पाहिजे, शहर व ग्रामीण भागात सर्व गरीबांना पक्की घरकुले बांधून मिळावी, शेतमजूर व ग्रामीण श्रमिकांसाठी सर्वांगिण केंद्रीय कायदा केलाच पाहिजे,शेतकजयांना कर्जमाफी व शेतमालाला रास्त भाव द्या या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास 9 जून जिल्हा दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू असा, इशारा संघटना पदाधिकार्यांनी दिला आहे.