सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली: सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. दोन दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर आज बुधवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. www.cbse.nic.in, www.results.nic.in, www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

91.46 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी 0.36 ने वाढली आहे. 18 लाख 73 हजार 15 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 17 लाख 13हजार 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.