सीबीएससी परिक्षेत रज्जाक मुल्ला, लुबना पटेल शाळेत प्रथम

0

नवापूर । नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एस एम चोखावाला लिटल एन्जेल्स एकेडमी शाळेचा सन 2016-17 च्या दहावी सीबीएससीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

यात रज्जाक जब्बार मुल्ला व लुबना युसुफ पटेल सिजीपीए -10 पैकी 10 गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत तर आकांक्षा दीपक मगावकर हिने द्वितीय क्रमांक सिमरन राजूभाई माखीजा हिने तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेच्या इतर विद्यार्थ्यांनी देखील सिजीपीए 8 पेक्षा अधिक गुण मिळवीत यश संपादन केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन दिवटे यांचे विध्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी वेळोवेळी हाती घेतलेले उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना केलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच विषय शिक्षकांचे मार्गदर्शनामुळे विध्यार्थ्यानी यश संपादन केले आहे.संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती विपिनभाई चोखावाला आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.