सीमेवरून दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक

0

फिरोजपूर – पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून सीमा सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रे मिळाली आहेत. तसेच पाकिस्तानी चलन, दोन मोबाईल आणि सिम कार्डदेखील जप्त करण्यात आले आहे. भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.

फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्तीसाठी गेले होते. त्याचवेळी साधारण पाच वाजता भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले दोन जण सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसले. जवानांनी त्यांना घेराव घातला तसेच त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. कोणत्या कारणांसाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते? याची चौकशी सीमा सुरक्षा दलातर्फे केली जाते आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.