नेरुळ । सिवूडस् विभागातील नागरिकांसाठी सिवूडस् मध्ये आधार केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे समीर बागवान यांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशाच्या वेळी आवश्यक असणारे आधार कार्ड तसेच पेन्शनधारी सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांना आवश्यक असणारे आधार कार्ड नोंदणीसाठी अथवा अपडेशन करण्यासाठी बेलापुर व नेरुळ येथील महानगरपालिका विभाग कार्यालयात जावे लागते. कार्यालये भौगोलिक दृष्ट्यालांब असून सिवूडस मधील नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत आहेत. सध्या केंद्र सरकारने अर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्ड सक्ती केली आहे. तर प्रत्येक शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी आधारकार्ड गरजेचे आहे.
नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
सिवूड्स भागात अनेक कुटुंब मुंबई व ठाण्यातुन स्थलांतरित झालेली आहेत.त्यांना आधार कार्ड काढणे गरजेचे आहे. मात्र विभागात केंद्र नसल्याने व पालिकेकडू जागृती केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे सिवूडस मधील नागरिकांकरिता सिवूडसमध्येच आधार नोंदणी केंद्र चालू करण्यात यावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना विभागातील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.या संदर्भात झालेल्या चर्चे दरम्यान पालिका आयुक्त रामस्वामी एन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी माहिती देताना सांगितले