भुसावळातील डी.एस.ग्राऊंडवर 15 वर्षानंतर भरल्या क्रिकेटच्या टुर्नामेंट
भुसावळ- शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राऊंड) तब्बल 15 वर्षानंतर क्रिकेटच्या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले. निमित्त होते सी.एम.चषक स्पर्धेचे. आमदार संजय सावकारे यांनी बॅटींग करीत पहिल्याच चेंडूवर चौकार मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. याप्रसंगी पाच संघामध्ये सामने खेळवण्यात आले.
पहिल्या दिवशी या संघांनी मिळवला विजय
रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये सुरत सी.सी., टीएसकेकेसी, हिंदू सूर्या सी.सी., स्वराज सी.सी., स्टूडंट संघ विजयी ठरला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, प्रमोद सावकारे, नगरसेवक राजेंद्र नाटकरण, किरण कोलते, पिंटू कोठारी गिरीश महाजन, देवा वाणी, किशोर पाटील, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, प्रशांत नरवाडे, आनंद शुक्ला व पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. हम्पायर म्हणून नासीर शेख, तौसीफ मिर्झा, वसीम खान, अॅण्डी, अझीम खान, जमीर शेख तर स्कोअरर म्हणून शेख फकरूद्दीन व रीयाज पठाण यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी अनिकेत पाटील, अर्षद सैय्यद, नदीम शेख, निलेश वारके आदी परीश्रम घेत आहेत.