सी ए इन्स्टिटयूटच्या अध्यक्ष पदी आमोद भाटे

0

पिंपरी : दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्षपदी सी.ए. आमोद दिनकर भाटे यांची वर्ष 2018-19 साठी निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात कत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष सी. ए. रवींद्र नेर्लीकर यांच्याकडून भाटे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. संस्थेचे नियुक्त केलेल्या अन्य पदाधिकारयांमध्ये उपाध्यक्षपदी युवराज तावरे, सचिव आणि खजिनदार प्राजक्ता चिंचोळकर तर कार्यकारी मंडळ सदस्य सुहास गार्डी, संतोष संचेती, अनिल अग्रवाल आणि सचिन बन्सल यांचा समावेश आहे.