सी.ए.सीपीटी परीक्षेत कृष्णा कॉमर्स अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

0

भुसावळ- जून 2018 मध्ये झालेल्या सी.ए.सीपीटी परीक्षेत शहरातील कृष्णा कॉमर्स अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांचे यश मिळवले. 18 पैकी 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अ‍ॅकेडमीचा 68 टक्के निकाल लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक प्रा.दिनेश राठी यांनी गौरव केला. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक पाटील, कृष्णा काकानी, अभिषेक भिरूड, ऋत्वीक जैन, हेमंत दुसाने, समीक्षा पाटील, अनघा फडके, नूतन पाटील, जयश्री माहेश्‍वरी, कल्पेश जंगले, नमिरा पिंजारी, अथर्व गोर्‍हे यांचा समावेश आहे. कृष्णा कॉमर्स अ‍ॅकेडमीचे मार्गदर्शक व सी.ए.दिनेश राठी, सी.ए.संतोष झंवर, सी.एस.संजीवनी लाहोटी, सौ.धांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.