वरणगाव । आयुष्य सुंदर बनवण्यासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता असते, जगात अशक्य असे काहिच नसते आचाराच्या मुळाशी विचार असतात. जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर नकारात्मक विचारांचा त्याग करून, सकारात्मक विचारांचा अंगीकार करा, असे प्रतिपादन आयएमआर जळगावचे संचालक डॉ. विवेक काटदरे यांनी संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानात बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अनंतराज पाटील, उपप्राचार्य के.बी. पाटील, प्रा. दिनू पाटील, आदींनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विचारांचे सॉफ्टवेअर स्थापित करा
डॉ. काटदरे पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवर अशक्य असे काहीच नाही. प्रत्येक व्यक्तीने ठरवले तर आपले विचार बदलून जीवनात यशस्वी होतो. त्याला आवश्यकता आहे. स्वताच्या शरीर रुपी हार्डवेअर मध्ये चांगल्या विचारांचे सॉफ्टवेअर स्थापीत केले तर चांगले आयुष्य जगता येते. तसेच विदयार्थ्यानी सुंदर आयुष्यासाठी चांगल्या विचारांचे व्यवस्थापन करून एक आदर्श जीवन जगावे.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी प्रा. के.बी. पाटील, प्रा. एल.जी. मोरे, प्रा. बी.बी. पाटील, प्रा.डॉ. सुरेश बच्छाव, प्रा. सुधाकर मोते, प्रा. बी.जी. देशमुख, प्रा. अशोक चित्ते, प्रा. एन.एस. धांडे, प्रा. ए.जी. काटकर, प्रा. वृषाली जोशी, कार्यलयीन अधिक्षक पी.एस. लाड, अतुल शेटे, राहुल ठाकूर, अविनाश पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राहुल संदानशिव यांनी केले तर आभार डॉ. अविनाश बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाची प्रास्ताविका प्रा. पी.बी. देशमुख यांनी केले.