मुंबई | महाराष्ट्रातील शेतक-यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नांवर सुकाणू समितीच्यावतीने अत्यंत गांभीर्यपूर्वक आंदोलन सुरु आहे. शेतक-यांचा अभूतपूर्व शेतकरी संप, महाराष्ट्र बंद व राज्यव्यापी जनजागरण दौ-यानंतर आता आंदोलनाची पुढील वाटचाल सुरु होत आहे, अशी माहिती शेतकरी संघटना सुकाणू समिती समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.
शेतकरी कर्जमाफी, पीक विमा प्रश्न, नवे कर्ज, दहा हजाराच्या कर्जाचा प्रश्न, पीक विमा व कर्जमाफीसाठी ऑन लाईनचा आग्रह, दुबार पेरणी, अधिवेशनात शेतीमालाच्या भावा संदर्भात कायदा करण्याचे न पाळलेले आश्वासन, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, मराठा मोर्चात उचललेल्या शेतकरी प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी केलेली उपेक्षा, या प्रश्नांवर सुकाणू समितीची भूमिका स्पष्ट करून लढ्याची व पुढील वाटचालीची दिशा 12 ऑगस्ट रोजी मुंबईत स्पष्ट करणार आहे, अशीही माहिती नवले यांनी दिली.