धरणाच्या जलपातळीत 35 सेंटीमीटरने वाढ : विसर्ग सुरू
रावेर- मध्यप्रदेश व पाल परीसरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सुकी धरणाच्या पातळी पेक्षा पाण्याचा विसर्ग 35 सेंटिमीटरने आता वाढला असून धरणाचे पाणी मंगळवारी तांदलवाडी गावापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुकी धरणाच्या ओहरफ्लो पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान 903 क्युसेस वेगाने पातळीपेक्षा 10 सेंटीमीटरने विसर्ग होत होता तर सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक हजार 798 क्युसेस वेगाने पातळी पेक्षा 35 सेंटीमीटरने विसर्ग वाढला असल्याचे येथील अधिकारी महेश पाटील यांनी दैनिक जनशक्तीला सांगितले तर आता सुध्दा सातपुड्यासह मध्यप्रदेशात जोरदार पाऊस सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ओव्हरफ्लो सुकी नदीचे पाणी आतापर्यंत आंदलवाडी पर्यंत पोहचले असुन दुपार किंवा सायंकाळपर्यंत हे तापीत पोहोचण्याची शक्यता आहे.
मंगळूर धरणातून 138 क्यूसेसने विसर्ग
सुकी पाठोपाठ मंगरुळ धरणातुन सुध्दा पातळी पेक्षा 20 सेंटीमीटरने 138 क्यूसेस वेगाने भोकर नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला पाणी असल्याने आणि जीर्ण पुल असल्याने पुनखेडा, पातोंडी, मुक्ताईनगरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे तर रावेरसह परीसरात पाऊस सुरुच आहे.
तालुक्यात रात्री असा झाला पाऊस
रावेर 36 मिलीमीटर, सावदा 27 मिमी, खानापूर 23 मिमि, ऐनपूर 25 मिमी, खिरोदा 36 मिमि, निभोरा 19 मिमि तर खिर्डी येथे 22 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.