सुकी नदीच्या पात्रात ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा मृत्यू

0

निंभोरा। रेती भरण्यासाठी ट्रॅक्टर नदीपात्रात उतरवित असताना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकलस्वारास वाचविण्याचा प्रयत्न केला असता चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह खड्ड्यात पडून ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू तर मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना बलवाडी येथे 15 रोजी दुपारी 2.30 वाजेदरम्यान घडली.

येथील सुकी नदीपात्रात ट्रॅक्टर ट्रॉली (एमएच 19-1228, एमएचपी 7760) हे वाहन रेती भरण्यासाठी नदी उतरवित मयत मनोज भिमराव तायडे (वय 29, रा. बलवाडी) असतांना समोरुन येणार्‍या मोटारसायकलस्वार रविंद्र मोरे यास वाचवण्यास गेले असता स्टिअरींगवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह खड्ड्यात पडून मनोज तायडे यांच्या डोक्यास ट्रॉली लागल्याने मयत झाला. तर मोटारसायकलस्वार मोरे हे जखमी झाले. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिपक सुरेश तायडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल वानखेडे करीत आहे.