जळगाव : दोन वर्षांपूर्वी वडिलांनी केलेल्या आत्महत्येचा कित्ता गिरवत सुनसगावच्या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लखन संजय सोनवणे (22, सुनसगाव, जि.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
कागदपत्रावरून पटली तरुणाची ओळख
लखन सोनवणे हा दोन भाऊ व आईसह वास्तव्याला आहे. सुनसगाव येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. बाहेर जावून येतो म्हणून बाहेर पडलेल्या लखनने आसोदा रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे खांबा क्रमांक 433/21 येथे पवन एक्सप्रेस समोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीलस ओळख पटलेली नव्हती. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वडिलांप्रमाणे केली आत्महत्या
दोन वर्षांपूर्वी लखन सोनवणेचे वडील संजय सोनवणे यांनी अंदाजे दोन वर्षांपूर्वी याच पध्दतीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती लखनच्या नातवाईकांनी दिली. या घटनेमुळे सुनसगावात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयताच्या आई रंजनाबाई, संजय व लहू हे दोन भाऊ असा परीवार आहे.