शहादा। तालुक्यातील आडगाव येथील महिला शेतकरी सुनिताबाई पावरा यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने जिजामाता कृषीभुषण पुरस्कार करण्यात आला. अत्यंत बिकट परीस्थितीत यांनी नविन तंत्राचा वापर करून शेती प्रगतीवर आणली आहे.तालुक्यातील आडगाव हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून जो तो आप-आपल्यापरीने शेतीव्यवसाय करीत असतात.अश्या या आडगाव येथिल तालुक्यातील प्रथम पहिली आदिवासी महिलेला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत जिजामाता कृषीभुषण पुरस्कार जाहिर करण्यात आला.
शेतात केलेल्या कष्टाचे फळ
या महिलेला मेहनतीचे फळ मिळाल्याने तीचा आनंद व्दिगुणीत झाला.ती म्हणाली की,मी गेल्या अनेक वर्षापासून मी स्व:ता शेतात काम करून आज या परीसरातील मी प्रगतशिल शेतकरी असुन यातच शासनाने मला आदर्श शेतकरी म्हणून गौरव केल्याने एक आदर्श समाजापुढे निर्माण झाला आहे.यावेळी शहादा येथिल कृषी सहाय्यक अधिकारी सुनिल सुळे, मंडळ कृषी अधिकारी बी.एस.पाटील, पी.डी.पटेल ,अशोक महिरे, जे.एन.पाटील आदिंनी सुनिताबाई यांचा सत्कार केला.सुनिताबाई ह्या नाशिक डिवीजन मधिल पहिली आदिवासी आदर्श महिला शेतकरी ठरली आहे.तीचा या विशेष पुरस्कारामुळे परीसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.